
मराठी भाषा गौरव दिन
ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालयात मराठीभाषा गौरव दिन उत्साहात संपन्न.
२७ फेब्रुवारी २०२५
सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्न, साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले सुप्रसिद्ध साहित्यिक
विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला “अभिजात भाषा”म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्राची “मायबोली मराठी” ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे.
आपल्या मायबोलीच्या सन्मानार्थ हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.
ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या अनुराधा निकम मॅडम तसेच ज्ञानगंगा शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी गायलेल्या सुरेश भटांच्या “लाभले आम्हास भाग्य”या कवितेच्या समूह गायनातून मायबोली विषयीचा जिव्हाळा, प्रेम व्यक्त केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली बहारदार नृत्ये, मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी भाषणे, मराठीतील सुप्रसिद्ध कवींच्या कवितांचे सादरीकरण केले. तसेच दृकश्राव्य माध्यमाच्या सहाय्याने मराठी भाषेची थोर संस्कृती आणि परंपरा यांची माहिती देण्यात आली. नाटक आणि पोवाडा या कार्यक्रमांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून उत्साहाचे वातावरण तयार केले.
अशा नानाविध कार्यक्रमांनी मराठी भाषा गौरव दिन सम्पन्न झाला.




























